परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखण्यावर भर देणे आवश्यक आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संगितले आहे.
‘इंडस्ट्रियल डिकार्बोनायझेशन समिट 2022’ अंतर्गत कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी आराखडा संबंधी परिषदेचे उदघाटन करताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, विजेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पर्यायी इंधन विकसित करणे आवश्यक आहे. तसेच या मुद्द्यांवर विकेंद्रित एकतर्फी दृष्टिकोन देशासाठी लाभदायक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रीन हायड्रोजनला आमचे प्राधान्य आहे, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण बायोमासची उत्पादकता वाढवू शकतो आणि बायोमास वापरून आपण बायो-इथेनॉल, बायो-एलएनजी आणि बायो-सीएनजी निर्माण करू शकतो. मिथेनॉल आणि इथेनॉलच्या वापराने प्रदूषण कमी होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.