वृत्तसंस्था/ मेझ (फ्रान्स)
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या मोसेली खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा अर्जेटिनाचा साथिदार अँड्रोझी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
पहिल्या फेरीतील सामन्यात हॉलंडच्या मिडलेकूप आणि रॉजेर यांनी बालाजी व अॅड्रोजी यांचा 6-7, 6-2, 10-7 अशा सेट्समध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या सुमीत नागलचे आव्हान फ्रान्सच्या मॉलेटने संपुष्टात आणले.









