Bala Bhegade News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरुवात केली आहे.कोल्हापुरातील विरोधी पक्षातील काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केला.आज कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक भाजप कार्यालयात पार पडली. माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.
यावेळी बोलताना बाळा भेगडे म्हणाले की, जागा वाटपात दोन्हीपैकी एक जागा भाजपला मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे युती म्हणून आपण एकत्रच लढणार आहोत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना भेगडे यांनी दिल्या. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील असं सांगताना आगामी काळात कोल्हापुरातील विरोधी पक्षातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट बाळा भेगडे यांनी केला.









