बेळगाव : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागात शौर्य संचलन करण्यात आले. यामध्ये बेळगाव परिसरातील शेकडो युवक शिस्तबद्धरित्या सहभागी झाले होते. भारतमातेचे पूजन करून सरदार्स हायस्कूल मैदानापासून संचलनाला सुरुवात झाली. यावेळी संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गीता जयंतीचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे शौर्य संचलन निश्चित करण्यात आले होते. काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली या प्रमुख मार्गांवरून धर्मवीर संभाजी उद्यान येथे संचलनाची सांगता झाली. विश्व हिंदू परिषदेचे आनंद करलिंगण्णवर, गदग येथील शिवानंद ब्रह्ममठाचे शिवानंद स्वामी यांच्यासह बेळगावमधील अनेक हिंदू संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, यासह इतर घोषणा देण्यात येत होत्या. संभाजी उद्यान येथे बजरंग दलचे राष्ट्रीय संयोजक नीरज डवणेरिया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. देशाचा विकास आणि हिंदू बांधवांची भूमिका यासह विविध विषयांवर नीरज यांनी माहिती दिली.
Previous Articleगणपत गल्लीतील अडथळे दूर करा
Next Article नक्षीदार वाकळं आणि उबदार गोधडी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









