मुंबई
दुसऱ्या तिमाहीतील निकालानंतर बजाज फिनसर्व्हचा समभाग शेअरबाजारात तेजीत असताना दिसला आहे. सदरचा कंपनीचा समभाग इंट्राडेदरम्यान 2 टक्के इतका तेजी राखताना दिसला आहे. पण नंतर पुन्हा घसरत 1573 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. कंपनीने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत 1929 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत नफा 1557 कोटी रुपये कमावला होता. एकत्रित एकूण उत्पन्न सदरच्या तिमाहीत 26 हजार 23 कोटी रुपयांचे राहिले आहे.









