22 सप्टेंबर ते 26ऑक्टोबरच्या कालावधीचा समावेश
नवी दिल्ली :
भारतातील सर्वात मोठ्या खासगी नॉन-बँकिंग फायनान्शियल (एनबीएफसी) कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने या वर्षी सणासुदीच्या काळात विक्रमी कामगिरी केली आहे. कंपनीने 22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान सुमारे 63 लाख ग्राहक कर्जे वाटली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 27 टक्के (वॉल्यूममध्ये) आणि 29टक्के (मूल्यात) वाढ आहे. या उत्कृष्ट कामगिरीनंतर कंपनीचा शेअर 1.68टक्क्यांनी वाढून 1,060.45 वर पोहोचला. गेल्या तीन महिन्यांत बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सुमारे 19.5टक्क्यांची वाढ झाली आहे, तर बीएसई सेन्सेक्समध्ये याच कालावधीत फक्त 3.35टक्के वाढ झाली आहे.
23 लाख ग्राहक जोडले
कंपनीने सणासुदीच्या काळात 23 लाख नवीन ग्राहक जोडले, त्यापैकी सुमारे 52 टक्के पहिल्यांदाच कर्ज घेणारे होते. बजाज फायनान्सने सांगितले की, ग्राहकांच्या मागणीत वाढ ही ग्राहकोपयोगी
वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी उपकरणे यासारख्या विभागांमधून झाली आहे. या वाढीमध्ये डिजिटल ऑनबोर्डिंग आणि मजबूत वितरण नेटवर्कने महत्त्वाची भूमिका बजावली, असे कंपनीने म्हटले आहे.









