मुंबई
वित्त क्षेत्रात कार्यरत बजाज फायनान्स कंपनीचा समभाग सलग पाचव्या सत्रात घसरणीत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढीस लागली आहे. मंगळवारी शेअरबाजारात इंट्रा डेदरम्यान समभाग 1 टक्का घसरत बीएसईवर 5776 रुपयांवर कार्यरत होता. गेल्या आठवडाभरात हा समभाग 6 टक्के इतका घसरणीत राहिला आहे. गेल्या 6 महिन्याचा विचार करता हा समभाग 23 टक्क्यापर्यंत खाली घसरला आहे.









