नवी दिल्ली :
केटीएम या ऑस्ट्रेलियातील बाईक निर्माती कंपनीला वाचविण्यासाठी बजाज ऑटो पुढे येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. केटीएममध्ये बजाज ऑटो 1362 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येते आहे.
बजाज ऑटो इंटरनॅशनल होल्डींग यांच्याकडे दिवाळखोरीत असणाऱ्या केटीएममध्ये 49 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. त्यांच्या संचालक मंडळाच्या 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये केटीएममध्ये गुंतवणूकीसाठी मंजूरी मिळविण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. 25 तारखेपर्यंत केटीएममधील गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.









