वार्ताहर,गोकुळ शिरगाव
Kolhapur : कोल्हापूर अर्बन बँकेतून 25 लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून मारुती राजाराम पाटील(वय 50) रा.वंदूर ता.कागल यांची फसवणूक केल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या काळात वेळोवेळी गोकुळ शिरगाव येथील अर्बन बँकेच्या समोर असलेल्या चहाच्या टपरी येते भेट घेऊन आजपर्यंत दीड लाख रुपये घेतल्याची मारुती पाटील यांनी संतोष रंगराव पाटील रा.वेताळ तालीम कोल्हापूर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आरोपी संतोष पाटील यांनी मारुती पाटील यांना आपण अर्बन बँकेत नोकरीत असून तुम्हाला 25 लाख रुपयांचे बँकेकडून कर्ज मिळवून देतो असे आमीश दाखवून सुरुवातीला 25 हजार रुपये घेऊन कोल्हापूर अर्बन बँकेचे कर्ज मंजूर झाले बाबतचे खोटे सेक्शन पत्र दाखवून जवळपास दीड लाख रुपयांची मारुती पाटील यांची फसवणूक करून त्यांना सातत्याने टोलवले जात होते. शेवटी मारुती पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संतोष पाटील यांच्या विरोधात आज गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला.या घटनेचा तपास सपोनी अविनाश माने यांच्यासह सहायक फौजदार तिवडे व पोलीस कॉन्स्टेबल इदे करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









