वार्ताहर /कुद्रेमनी
येथील श्री राजा शिवछत्रपती कब्बडी संघाने आयोजित केलेल्या 60 व 51 किलो वजनी गटात शिवछावा कब्बडी संघ बैलूर (खानापूर) संघाने 1101 रू व 7001 रू, दोन्ही बक्षिसे जिंकली. शनिवारी रात्री व रविवारी या स्पर्धा झाल्या. मान्यवरांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. गावातील म. ए. समितीचे जेष्ठ कार्यकर्ते ईश्वर गुरव हे स्पर्धा उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष होते. ग्रा. पं. अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाले. दोन्ही वजनी गटात बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यातील 28 पेक्षा अधिक संघानी स्पर्धेत भाग घेतला होता. प्रारंभी जी. जी. पाटील यानी प्रास्ताविक केल्यानंतर संघाचे अध्यक्ष चेतन यळ्ळूरकर व विजय पाटील यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. ग्रा. पं. सदस्य शांताराम पाटील, शिवाजी मुरकूटे, ग्रा. पं. माजी सदस्य अर्जुन जांबोटकर, नागेश राजगोळकर, काशिनाथ गुरव, मोहन पाटील, डॉ. विजय पाटील, तानाजी पाटील आदींच्याहस्ते बक्षिसे व फोटो प्रतिमांचे पूजन झाले. नागेश राजगोण्कर, जी. जी. पाटील, तानाजी पाटील, अध्यक्ष संजय पाटील यानी खेळाचे महत्व व खिलाडू वृर्त्ती बाबत विचार व्यक्त केले. रामलिंग पाटील, दशरथ हुद्दार, श्री माळी, जोतिबा काकतकर, दिपक पाटील, संजय पाटील, मलाप्पा पाटील, किरण सुतार आदींच्या बक्षिसे वाटण्यात आली. 60 किलो वजनी गटात दुसरे बक्षिस राजा शिव छत्रपती संघ कुद्रेमनी रू 7001 व तिसरे जय हनुमान कौलगे संघाने 5001 रू, बक्षिस जिंकले. 52 किलो वजनी गटात जय हनुमान कौलगे 5001 रू दुसरे बक्षिस व राजा छत्रपती संघाने तिसरे 3001 रू बक्षिस जिंकले. यावेळी वैयक्तिक बक्षिसांमध्ये हर्षद बैलूर उत्कृष्ठ, जय कुद्रेमनी उत्कृष्ठ पकड व अष्ठपैलू खेळाडू तसेच राजेश कौसगे यलाप्पा कौलगे यानी बक्षिस जिंकली.








