वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते अन् दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांची पत्नी पूनम यांना जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणातील आणखी दोन आरोपी अजित प्रसाद जैन आणि सुनील कुमार जैन यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. तर आरोपी अंकुश अन् वैभव यांच्या जामीन याचिकेवर 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाकडून सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा मिळाला होता. दिल्ली विधानसभेतून बडतर्फ करण्याची तसेच राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. सत्येंद्र जैन यांची न्यायालयीन कोठडी 27 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.









