Bail Denied for Attempted Murder Suspects
प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली मागील सुमारे महिनाभरापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या हादी अब्दुलबारी खान ३५ आणि कय्यूम अब्दूलबारी खान २२ दोन्ही राहणार मूळ उत्तरप्रदेश सद्या राहणार कुडाळ यांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भरूका यांनी फेटाळून लावला आहे.सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
चंदुलाल विश्राम पटेल हे आरोपींविरुद्ध तक्रार देण्यासाठी कुडाळ पोलीस स्थानकात आले होते. तेथून ते परत जात असताना त्यांना कुडाळ पोलीस स्थानक परिसरात दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न दोन्ही संशयितांनी केला होता. ३ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी संशयितांवर ३०७, ३४१, ५०६, 3४ नुसार गुन्हा दाखल करून ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
प्रतिनिधी /ओरोस