सावंतवाडी / प्रतिनिधी
Bahujan Samaj Public Awareness Parishad on 19th April in Sawantwadi
राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा महाराष्ट्र राज्यव्यापी परिवर्तन यात्अंतर्गत बहुजन समाज जनजागृती परिषद 19 एप्रिल दुपारी तीन वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका मांजरेकर यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून गजानन नानचे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीकांत होवाळ प्रदेशाध्यक्ष बीएमपी असणार आहेत. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा नवी दिल्लीचे अध्यक्ष विकास चौधरी पटेल असणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक समाज तालुकाध्यक्ष सदानंद पवार ,कुंभार संघटना युवा अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा प्रभारी व्ही.व्ही जाधव जिल्हा बहुजन मुक्ती पार्टी अध्यक्ष लाडु जाधव ,क्रांती मोर्चा जिल्हा प्रभारी के.एस कदम कोलगाव माजी ग्रामपंचायत सदस्य पूनम नाईक प्रमोद जमदाडे शितल जाधव सत्यशीला बोर्डे यांनी केले आहे . या यात्रे अंतर्गत जातनिहाय जनगणना करणे क्रिमिनलियरची अट रद्द करणे 52टक्के ओबीसींना 52 टक्के आरक्षण दिले जावे आरक्षण लागू करणे घोटाळा आदी बाबत चर्चा होणार आहे.









