पावसाळा आला की काहीतरी चटपटीत आणि गरमा-गरम खावस वाटतं. हातात चहा, भजी आणि पाऊस अस समीकरण सर्वांनाच आवडतं. तर पावसाळ्यात नाश्त्याला रोज वेगळ काय बनवायचं असा प्रश्न गृहणींना पडतो. घरात प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यातल्या त्यात प्रत्येक भाजी सगळेच खातात असं नाही. कोबी आणि फ्लाॅवर नाश्त्यात असेल तर नाक मुरडायला होत. अशावेळी काय बनवावं जेणेकरून ती भाजी पोटात जाईल असा विचार केला जातो. त्यातच पोहे, उपमा, डोसे हा पदार्थ खाऊन कंटाळा आलायं तर जाणून घ्या नवीन रेसीपी. ज्यामध्ये कोबीही असेल आणि पोहे ही असेल. मात्र खाल्यावर तुम्हाला याची टेस्ट खूप आवडेल. लहान मुलांना देखील पोष्टिक असा नाश्ता खाऊ घालाल. चला तर जाणून घेऊया.
साहित्य
१ वाटी पोहे
दिड वाटी किसलेले कोबी
ज्वारीचे पीठ -अर्धी वाटी
लसूण पाकळ्या- ८ ते १०
मिरची -४ ते ५
ओवा-पाव चमचा
जिरे-अर्धा चमचा
मिठ-
हिंग- हळद, मीठ
चिरलेला कांदा
कृती:
सुरुवातीला पोहे ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या. थोडेसं पाणी (अगदी अर्ध बोट भिजेल एवढ पाणी) त्यात भिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिरची, लसूण, ओवा, जिरे मिक्सरला वाटून घ्या. पेस्ट थोडी जाडसर करा. त्यानंतर कोबी स्वच्छ धुवून खिसून घ्या. दिड कप कोबी घ्या. पोहे स्मॅश करा. त्यात ठेचा घाला. त्यानंतर त्यात धनेपूड अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ ,कोथिंबिर, पाव कप ज्वारीचे पीठ घाला. आता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण सरसरीत करून घ्या. त्यात आता किसलेला कोबी, बारिक चिरलेला कांदा घाला. थालीपीठ करतो त्यापेक्षा थोड घट्ट आणि डोसा करतो त्यापेक्षा थोड सैलसर अस पीठ करून घ्या. सरबरीत पीठ करून घ्य़ा. त्यानंतर पॅनमध्ये तेल घालून बॅटर (मिक्स केलंल मिश्रण) घाला. दोन मिनिट झाकण घालून शिजवून घ्या. त्यानंतर पलटून खालच्या बाजूने खरपूस भाजून घ्या. गरमा-गरम सर्व करा.
टीप- हे करत असताना घावण तुटतय अस वाटल्यास त्यात ज्वारीचं पीठ घाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









