प्रतिनिधी/ बेळगाव
पावनक्षेत्र असलेल्या बडेकोळ्ळ मठात दरवर्षीप्रमाणे श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. 22 व शनिवार दि. 23 रोजी नागेंद्र महास्वामींचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला. शनिवारी दुपारी 1 वाजता भाविकांच्या उपस्थित रथोत्सव काढण्यात आला. यानंतर महाप्रसाद वाटपाने यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.
शुक्रवारी मास्तमर्डी व तारिहाळ येथून पालख्यांचे स्वागत करण्यात आले. रात्री भजन, जागरणासह विविध कार्यक्रम पार पडले. शनिवारी सकाळी 9 वाजता नागेंद्र महास्वामींच्या सिंहासनाला महारुद्राभिषेक करण्यात आला. तर 11 वाजता महास्वामींची पाद्यपूजा व 11.30 वाजता पालखी उत्सव पार पडला. दुपारी 1 वाजता प्रमुख मार्गावरून रथोत्सवास प्रारंभ झाला. रथोत्सव मार्गावर भाविकांकडून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी भाविकांकडून फुलांचीही उधळण करण्यात आली. रथ मठात आल्यानंतर रथोत्सवाची सांगता करण्यात आली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटपाने यात्रोत्सवाची सांगता झाली.









