न्हावेली / वार्ताहर
काम योग्य प्रकारे न केल्यास बंद पडणार ;माजी सभापती राजू परब यांचा इशारा
मळगाव कुभांरवाडीतील गॅस कंपनीकडून सुरु असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे ते योग्य प्रकारे करा , अन्यथा काम रोखण्यात येईल , असा इशारा सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती राजू परब यांनी दिला आहे . या कामाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर परब यांनी उपसरपंच हनुमंत पेडणेकर व अन्य ग्रामस्थांना घेऊन परिसरातील पाहणी केली . यावेळी हे काम चांगल्या प्रकारे करा , अन्यथा ते रोखले जाईल असा इशारा त्यांनी दिला .
यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनुजा खडपकर, प्रेमानंद राऊळ , एकनाथ खडपकर, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, दिपक जोशी, दत्तप्रसाद नाईक, सुरज राऊळ, भाऊ कवटकर, नंदू केरकर, प्रकाश वराडकर, व कुभांरवाडीतील सर्व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .









