खानापूर – शहराचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बेळगाव गोवा रस्त्यावर मलप्रभा नदी किनारी जॅकवेल बांधण्यात आला आहे. तिथून पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करण्यासाठी जॅकवेलमध्ये दोन ५० एचपीच्या मोटारी कार्यरत आहेत. मात्र दोन्ही मोटारी नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. नगरपंचायतीचे कर्मचाऱी व नगरसेवकांचा दुर्लक्षपणाचा कळस म्हणावा लागेल, दोन्ही मोटारी नगरपंचायतीच्या दुर्लक्ष मुळे बंद पडलेल्या आहेत. यापूर्वी मोटारी बेळगाव येथील एका कारागिराकडून दुरुस्त करण्यात आल्या होत्या. मात्र काही कारणास्तव गेल्या काही दिवसापासून अळणावर येथील कारागिरांकडून मोटार दुरूस्त करून घेतल्या जात आहेत. मात्र या कारागिराकडून मोटारची दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसून देखील दुरूस्ती साठी वेळोवेळी मोठी रक्कम अदा करण्यात आल्याचे समजते. गेल्या काही वर्षांत मोटारी दुरुस्तीसाठी जी रक्कम खर्च करण्यात आली या रकमेत नव्या मोटारीच आल्या असत्या अशी चर्चा आहे. नगरपंचायतीकडून दोन दिवसाला एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र वर्षाची पाणी पट्टी आकारण्यात येते.
याबाबत नगरसेवक आपली जबाबदारी झटकत आहेत. तर कर्मचारीही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे खानापूर शहराचा पाणीपुरवठा बेभरवशाचा झाला आहे. संबंधित नगरसेवक कर्मचाऱ्यांनी लक्ष घालून हा पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच पाणी उपसा करणारा मोटारी बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी शहरातून होत आहे.
Previous Articleराज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास 1 लाखाचे रोख बक्षीस
Next Article ‘त्यांना’ महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय









