रस्त्यावर ठिकठिकाणी ख•dयांचे साम्राज्य : रस्त्याच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्यातील नागरगाळी-कटकोळ राज्य मार्गापैकी हलशी ते नागरगाळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरगाळीपासून हलशी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी ख•dयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालविण्याची वेळ आली असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. हलशी-नागरगाळी हा 15 कि. मी.चा रस्ता आहे. या रस्त्याला विविध कारणांमुळे विशेष महत्त्व आहे. या रस्त्याचा विकास वर्षापूर्वी झाला होता. गेल्या सात-आठ वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या रस्त्यामुळे बेळगाव-दांडेली अंतरदेखील 22 कि. मी. होते. दांडेली परिसरात गेल्या आठ-दहा वर्षात बरीच रिसॉर्ट झाली आहेत. त्यामुळे बेळगाव, धारवाड, कित्तूर परिसरातून येणाऱ्या प्रवासी व पर्यटकांची संख्या वाढली आहे. बेळगाव-दांडेली अंतर कमी करणारा हलशी मार्ग असल्याने बरेच पर्यटक याच रस्त्याचा वापर करीत आहेत. त्यातच कुंभार्डा येथे नाथपंथिय हंडीभडंगनाथ मठ आहे. या मठावर विविध भागातून भक्त येत असतात. या भागात घनदाट जंगल असल्याने जंगल सफारीसाठी अनेक लोक या रस्त्याचा उपयोग करतात. या रस्त्यादरम्यान मेंढेगाळी, हत्तरवाड, हलगा, मेरडा, किरहलशी, करजगी, सुलेगाळी, बस्तवाड ही गावे येतात. शिक्षण, दवाखाना, कार्यालयीन कामकाजानिमित्त या गावातील जनतेचा हलशी, नंदगड खानापूरशी नेहमीच संपर्क असतो. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक बऱ्यापैकी आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी ख•s पडले आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. तर रस्त्याच्या बाजूच्या गटारी माती व वाळुमुळे बुजले असल्याने पावसाचे व गटारीतील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यावर माती साचल्याने रस्त्यावर वाहने घसरत असून अपघाताचा संभव आहे. त्यासाठी या रस्त्यावरील ख•s बुजवावेत, रस्त्याच्या बाजूच्या चरी बुजवाव्यात व दोन्ही बाजूंच्या गटारी साफ कराव्यात, अशी मागणी होत आहे.









