मैदानावर चिखल-काटेरी झुडुपांमुळे विद्यार्थ्यांना खेळताना त्रास : ग्रा. पं. चे दुर्लक्ष, नागरिकांतून नाराजी
वार्ताहर /गुंजी
येथील मराठी माध्यमिक शाळेसमोरील मैदानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मैदानावर चिखल व काटेरी झुडपांमुळे विद्यार्थ्यांना खेळताना त्रास होत असल्याने गुंजी ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर मैदानाची गतवषीच ग्रा.पं.च्यावतीने लाखो ऊपये खर्च करून सुधारणा करण्यात आली होती. मात्र दर्जाहीन कामामुळे मैदानाची सध्या पुरती वाताहात झाल्याने विद्यार्थ्यांना या मैदानावरून चालणेही मुश्कील झाले आहे. सदर मैदानावर सध्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील शिक्षक व शाळा सुधारणा कमिटीच्या सदस्यांनी गुंजी पंचायतीला मैदानाची पाहणी करण्यास भाग पाडले. त्यावेळी पंचायतीच्या सदस्य व अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून देण्याची ग्वाही दिली होती. मात्र स्पर्धा सुरू होऊन देखील या ठिकाणी कोणतीच दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी स्पर्धकांना मैदानावर धावण्याच्या स्पर्धांबरोबरच इतर क्रीडाप्रकार करणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाच लाखांचा निधी चिखलात
सध्या या मैदानावर सर्वत्र चिखलाचे साम्राज पसरले असून ठिकठिकाणी लाजाळूची काटेरी झुडपे असल्याने पाय ठेवणेही मुश्कील झाले आहे. वास्तविक गतवषी या मैदानाची 5 लाख ऊपये खर्च करून सुधारणा करण्यात आली होती. मात्र सदर निधी चिखलात गेला म्हणण्याची वेळ आली आहे. मैदान सुधारणा काम सुरू असताना नागरिकांनी आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी कामाबाबत तक्रार केली होती. मात्र याकडे सदस्यांनी जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याने याचे परिणाम येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा, सरकारी उर्दू शाळा, सरकारी मराठी हायस्कूलमधील मुलांना भोगावे लागत असल्याची खंत विद्यार्थी व नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. तरी पंचायतीने याची त्वरित दखल घेऊन मैदानाची डागडुजी करावी, अशी आग्रही मागणी होत आहे.
संरक्षक भिंतीचे कामही अर्धवट
या मैदानाच्या संरक्षक भिंतीसाठी जवळजवळ बारा लाखांच्या निधीतून गुंजी पंचायतीने संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेतले होते. मात्र तेही काम रखडले असून संरक्षक भिंत नसल्याने या मैदानामध्ये अनेक जनावरे येत आहेत. त्यांच्यामुळेच मैदानामध्ये ख•s पडत आहेत. त्यामुळे धावताना विद्यार्थ्यांचा ख•dयात पाय जाऊन पडत असल्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत.









