Bacchu Kadu On Ajit Pawar : खाते वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झुकते माप दिले आहे. अजितदादा यांच्याकडे अर्थ खातं दिलं असेलं तरीही मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच आहेत, त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. मागे जो गफलतपणा झाला तो आता होणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. काल राज्याचं खाते वाटप झालं यावर त्यांनी आज प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की,अजिदादांना अर्थखातं देऊ नये असा नाराजीचा सुर शिंदे गटाकडून होता.यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मागचा अनुभव पाहता असं म्हणालो होतो.सगळ्यांचं मत जर असेल तर अर्थमंत्रीपद नका देऊ असं मी म्हणालो होतो. मात्र मी आता खुश आहे. मी नाराज नाही. कारण लोकं मंत्रीपद मागत होते मी तर मंत्रालय घेतलं. ज्या दिव्यांग बांधवांसाठी माझ्याकडे खातं आलाय. दिव्यांग बांधवांसाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही त्यामुळे मी समाधानी असल्याचे ते म्हणाले.