Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होईल असं मला सांगण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाबाबत दिलेला शब्द पाळणार असल्याचंही सांगितलंय. हा मंत्रिमंडळ विस्तार 40 दिवसांनी झाला तर ठिक, अन्यथा पुढच्या अडीच वर्षात होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. सध्या धोका देणाऱ्यांचं राज्य आहे अशी टिका त्यांनी सरकारवर केली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. यामध्ये 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळं काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केलीय. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी काल प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत घणाघात केला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाळला गेला नाही तरी मला विश्वास आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय.
Previous Articleमला भाजपची राष्ट्रवादाची कल्पना अजूनही समजत नाही : प्रकाश राज
Next Article सण लाडक्या भावाचा ; बाजारपेठा राख्यांनी गजबजल्या !








