बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित बाबुराव ठाकुर आंतरशालेय मुला, मुलींच्या हॉकी स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा विभागाचे चेअरमन आनंद सराफ, बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, एन. बी. नदाफ, एम. जे. तेरणेकर, जी. ए. जहागीरदार, उत्तम शिंदे, एस. एस. नरगोडी, प्रशांत मनकाळे, विनय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत एम. आर. भंडारी स्कूल, जी. जी. चिटणीस, ताराराणी खानापूर, सेंट जॉन काकती, ज्ञानमंदिर व शानभाग या मुलींच्या संघांनी तर मुलांच्या गटात भंडारी अ-ब, ज्ञानमंदिर, एम. व्ही. हेरवाडकर अ-ब, शानभाग आदी संघांनी भाग घेतला असून या संघादरम्यान साखळी सामने खेळविली जात आहेत. मंगळवारी अंतिम फेरीचे सामने होणार आहेत, अशी माहिती धनंजय पटेल यांनी दिली.
Previous Articleजलतरण स्पर्धेत हलगेकर, कुंभार यांची चमक
Next Article बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेची बैठक खेळीमेळीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









