बेळगाव
‘तरुण भारत’ सोसायटी संचालित जांबोटी येथील बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 71 टक्के लागला. वाणिज्य विभागात हर्षदा डांगे हिने 93.33 टक्के गुण घेऊन प्रथम, संपदा गावडे हिने 91.66 हिने

द्वितीय व कल्लाप्पा पाटील याने 87.83 टक्के गुण घेऊन तिसरा क्रमांक मिळविला. कला शाखेतून निकिता घाडी हिने 81.16 टक्के गुण घेऊन प्रथम, सुभाष चंद्रकांत गावकर, बाबुराव हणबर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. या सर्वांना संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर, संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक यांचे मार्गदर्शन
लाभले.









