ओटवणे । प्रतिनिधी
विलवडे टेंबवाडी येथील रहिवासी बाबली न्हानू सावंत (६९) यांचे बुधवार ३ सप्टेंबर रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईस्थित गुरुप्रसाद सावंत ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.









