सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अवमान नोटीसला उत्तर न दिल्याप्रकरणी आयुर्वेदिक कंपनी पतंजलि आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण आणि योगगुरु रामदेव यांना पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाने हा आदेश काही जाहिरातींसंबंधी दिला आहे.
तुमच्याविरोधात अवमानाची कारवाई का सुरू करू नये अशी विचारणा न्यायालयाने बाबा रामदेव यांना केली आहे. आचार्य बालकृष्ण आणि बाबा रामदेव या दोघांनाही सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे. आता याप्रकरणी सुनावणी टळणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायाधीश हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात कंपनीच्या विरोधात याचिका दाखल केली होती.









