Baba Ramdev : खाद्यतेलाच्य़ा निर्मितीत देशाला स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे.लवकरच पतंजलीच्या कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार असल्याची माहिती ‘पतंजली’च्या बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोजगार निर्मितीसाठी पतंजली मोहिम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत पतंजलीकडून ५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. आणखी लोकांना रोजगार मिळावा यासाठी मोहिम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पंतजलीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्वच क्षेत्रातून मला आणि पतंजलीला विरोध केला. मी कसा माफिया आहे हे ठरवण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या आशीर्वादाने पतंजलीला खूप यश मिळाले आहे. पतंजलीचे यश पाहून काहींनी ईर्षा करण्यास सुरुवात केली आहे. मल्टिनॅशनल कंपन्यांकडून आयुर्वेदाला विरोध दर्शविन्यात आला. आमच्याविरोधात वेगवेगळ्या माफियांनी चक्रव्यूह रचले. बदनामीचे अनेक प्रयत्न झाले यासाठी मोठं षडयंत्र रचल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला.
पतंजलीचं लक्ष्य एक लाख कोटी टर्नओव्हरचं आहे. देशाच्या आर्थिक समृध्दीत पतंजलीचं योगदान आहे. जगातलं सर्वात मोठं रिसर्च सेंटर आमच्याकडे आहे. ५०० पेक्षा जास्त संशोधक काम करतात.तरीही प्रोडक्ट्सबद्दल अफवा पसरवल्या गेल्याचेही ते म्हणाले.
Previous Articleखुसखुशीत आणि स्वादिष्ट मटार कचोरी
Next Article शिवाजी उद्यानामध्ये शिवसृष्टीचे उद्घाटन करा








