आधात्माचे जाणकार आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं आहे. गेले काही दिवस ते त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातला एक तारा निखऴला आहे. नेरूळ येथिल त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोर वास्तव्यास होते.
महाराजांचे पार्थिव शरीर आज नेरूळ येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून शुक्रवारी 27 ऑक्टोबरला त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात करण्यात येणार आहे.
बाबामहाराज सातारकर असे आपल्या भक्तांमध्ये आणि आधात्मिक क्षेत्रात परिचित असलेल्या महाराजांचे खरे नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे होय. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यातील गोरे- सातारकर या प्रतिष्ठित घरात झाला. त्यांना आध्यात्माची जाण आणि आवड घरातूनच निर्माण झाली त्यामुळे त्यांनी आयुष्याचा बराच काळ हा निरुपण करण्यात घालवला. त्यांच्या निरूपणाच्या वेगळ्या आणि भावणाऱ्या शैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच लोकप्रीयता मिळवली. त्याचे मुळ नाव मागे पडून ते बाबा सातारकर या नावाने महाराष्ट्रासह देशभरात ओळखू लागले.
वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकारांचा फड म्हणून सातारकर घराण्याला ओळखले जाते. अनेक पिढ्यांपासून सातारकरांच्या महाराजांच्या घरी प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकरांच्य़ा पश्चात त्यांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज यांनी ही परंपरा जोपासली आहे.
बाबा महाराज सातारकरांच्या निधनाने महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि आधात्मिक क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. काही महिन्याभरापुर्वीच महाराजांच्या पत्नी यांचे निधन झाले होते. महाराजांच्या पश्चात दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे.








