पुणे
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव मागीत तीन दिवसांपासून आत्मक्लेश उपोषणाला बसले होते. या ठिकाणी आज अजित पवार यांनी डॉ आढावांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत यांनी डॉ आढावांची भेट घेतली. डॉ बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीने हे आंदोलन पुढे घेऊन जावे. अशी अपेक्षा डॉ आढावांनी व्यक्त केली.
एवढ्याश्या आंदोलनाने काय होईल असे वाटत असेल, पण वणवा पेटायला एक ठिणगी कारणीभूत असते आणि ती आज या ठीकणी पडली आहे. असे बोल उद्धव ठाकरे यांनी उद्गारले.








