मुंबई : ८० आणि ९० च्या दशकातील अॅक्शन हिरो जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सनी देओल आणि मिथुन चक्रवर्ती यांचा नवीन चित्रपटाची पहिली झलक पहायला मिळत असून चित्रपटांचे 80-९० चे दशक परत आले असल्याचा भास होत आहे. बाप या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवरून चित्रपटातील आपल्या गँगस्टर लुकचा फर्स्ट लुक अभिनेत्यांनी प्रदर्शित केला.
आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करत “शूट धमाल…दोस्ती बेमिसाल.” असे जॅकी श्रॉफने म्हटलंय. या फोटोमध्ये ४ अभिनेते एका पायरीवर बसून कॅमेराकडे पाहत आहेत. जॅकीने लष्करी कॅमफ्लाज जॅकेट आणि अंडरशर्ट घातला असून हेडबँड लावलेला आहे. जॅकी श्रॉफचा हा ‘सिग्नेचर लूक’ त्याच्या पुर्वीच्या चित्रपटांची आठवण करून देत आहे. त्याचप्रमाणे, संजय दत्त लेदर जाकेट घालून त्याच्या २००० च्या दशकातील हेअरस्टाइलसह दिसत आहे.
अमेरिकन जेलसूट सारखाच पण रंगाने खाकी असलेला ओव्हरल घालून लांब केस आणि दाढीमध्ये सनी देओल दिसत आहे. सनीचा हा लुक त्याच्या याआधीच्या बऱ्याच चित्रपटात आहे. त्याच्या अनेक चाहत्यांना त्याचा हा अवतार त्याच्या ९० च्या दशकातील ‘जीत’ चित्रपटातील असल्याचे वाटत आहे. आपल्या तिरक्य़ा आर्मी कॅपसाठी प्रसिद्ध असलेल्या मिथुन चक्रवती यांनी डेनिमशर्ट आणि लेदर जॅकेट या त्याच्या पुर्वीच्या लुकमध्ये पोझ दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








