अभिनेता टायगर श्रॉफचा चित्रपट ‘बागी 4’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये रक्तपात, जबरदस्त अॅक्शनदृश्ये दिसून येत आहेत. टायगर ट्रेलरमध्ये नौदल अधिकाऱ्याच्या गणवेशात रक्ताने माखलेल्या स्थितीत दिसून येतो. चित्रपटात प्रेम, प्रेमभंग आणि सूड तसेच हिंसा दाखविण्यात येणार आहे. नायक आणि खलनायक दोघेही प्रेमभंगाने दु:खी असून त्यांचा परस्परांशी जुना इतिहास जोडलेला आहे. हरनाज संधू आणि सोनम बाजवा यात मुख्य भूमिकेत आहेत.
हरनाज संधू टायगरच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. तर सोनम बाजवाच्या भूमिकेशी देखील त्याचे नाते आहे. मिस युनिव्हर्स 2021 राहिलेली हरनाज ही ‘बागी 4’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे, सौरभ सचदेव आणि उपेंद्र लिमये देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘बागी 4’ चित्रपटाची काही गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली आहेत. चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळाले आहे. टायगर श्रॉफच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दशन ए हर्षने केले आहे. ‘बागी 4’ हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









