वृत्तसंस्था/नवी दिल्ली
वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. श्रीनिवासन यांची नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीनिवासन हे 1992 च्या तुकडीचे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने श्रीनिवासन यांची एनएसजीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. 31 ऑगस्ट 2027 पर्यंत म्हणजेच सेवानिवृत्तीपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. श्रीनिवासन हे सध्या बिहार पोलीस अकॅडमीचे संचालक आहेत. एनएसजीचे महासंचालकपद नलिन प्रभात यांना जम्मू-काश्मीर पोलीस विभागाचा नवा प्रमुख नियुक्त केल्यापासून रिक्त होते. 15 ऑगस्ट रोजीच प्रभात यांची नवी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती.









