तुरुंगातून बाहेर पडण्याची शक्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे मातब्बर नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. आझम खान यांना 89 व्या गुन्हय़ाप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. परंतु तरीही आझम खान कधीपर्यंत तुरुंगातून बाहेर पडतील हे स्पष्ट झालेले नाही.
काही दिवसांपूर्वी आझम यांच्या विरोधात एका अन्य प्रकरणी पोलिसांनी स्वतःच्या कारवाईला वेग दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आझम यांना गुरुवारी मोठा दिलासा दिला. सक्षम न्यायालयाकडून नियमित जामिनाचा निर्णय होईपर्यंत अंतरिम जामीन कायम राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे यासंबंधीच्या याचिकेवर निर्णय आल्यावरच आझम तुरुंगातून बाहेर पडणार असल्याचे मानले जात आहे. आझम हे फेब्रुवारी 2020 पासून सीतापूर येथील तुरुंगात कैद आहेत. आझम हे तुरुंगात गेल्यापासून उत्तरप्रदेशचे राजकारण खूपच तापले आहे.









