वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री मोहम्मद आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. आझम खान यांच्यावर रामपूरमधील क्वालिटी बारमध्ये अवैधपणे कब्जा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती समीर जैन यांच्या एकल खंडपीठाने केल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. आता जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते गेल्या 23 महिन्यांपासून सीतापूर तुरुंगात कैद होते.









