वृत्तसंस्था/ लखनौ
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना पुन्हा वाय श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. रामपूरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या शिफारशीवरून वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली. यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांच्या सुरक्षा विभागाने आझम खान यांना झटका देत वाय श्रेणीची सुरक्षा काढून घेतली होती. त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा राखण्याचे औचित्य दिसत नाही, असे स्पष्टीकरणही देण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्यांना सदर सुरक्षा देण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसंदर्भातील निकषानुसार वाय सुरक्षा कवच अंतर्गत एकूण 11 जवान मिळतात. त्यात दोन कमांडो आणि दोन पीएसओही समाविष्ट असतात.









