गांधीनगर :
जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्र्रेयसस यांनी भारतातील आरोग्य योजना ‘आयुष्मान भारत’चे कौतुक केले आहे. ते गुजरातमधील गांधीनगर येथे सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेत आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. डॉ. टेड्रोस यांनी यजमान भारताचे आभार मानून भाषणाला सुऊवात केली. यानंतर त्यांनी भारतातील आरोग्य सेवांची प्रशंसा केली. याशिवाय टेलिमेडिसिन प्रक्रियेबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. तसेच आपल्या शेवटच्या भारत भेटीच्या आठवणी सांगितल्या. या बैठकीत वेगवेगळ्या देशातील 70 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.









