लाभार्थी कार्डच्या प्रतीक्षेत
प्रतिनिधी/ बेळगाव
आरोग्याच्या सुविधा पुरविणाऱ्या आयुषमान भारत या ओळखपत्र वितरणाचे काम थांबविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने आरोग्य खात्याने हा निर्णय घेतला आहे. काही काळापुरती आयुषमान भारतला स्थगिती देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासकीय कागदपत्रांमुळे गोंधळ होऊ नये, यासाठी काहीकाळ आयुषमान भारतचे काम थांबविले आहे. आयुषमान भारत कार्डधारकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. मात्र अद्याप काही नागरिकांना आयुषमान भारत कार्ड मिळाले नाही. दरम्यान निवडणुकीमुळे या कामात व्यत्यय आला आहे. त्यामुळे आयुषमान भारत कार्डसाठी नागरिकांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आयुषमान भारत योजनेंतर्गत गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. बीपीएल कार्डधारकांना आयुषमान भारत हे कार्ड उपलब्ध करून दिले जाते. मात्र काही लाभार्थ्यांकडे बीपीएल कार्डच नसल्याने आयुषमान भारत कार्डपासूनही वंचित राहावे लागत आहे. निवडणुकीमुळे या कामात अडथळा आला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.









