श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : प्रख्यात आयुर्वेदिक वैद्य डॉ. सरदेशमुख यांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पणजी : आयुर्वेद पद्धतीत कॅन्सरसारखे रोग बरे करण्याची क्षमता आहे. पण ही पद्धती दाबून ठेवण्याचे प्रयत्न झाले आणि अजूनही होत आहेत. पाच हजार वर्षांची परंपरा असलेली ही औषधपद्धती टिकवून ठेवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. पर्वरी येथे प्रख्यात आयुर्वेदिक डॉ. सुकुमार सदानंद सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आलेल्या या आयुर्वेदिक वैद्यकीय शिबिरात प्रमुख पाहुणे या ना त्यानेनाईक बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, साळगांवचे आमदार केदार नाईक, भाजपाचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, रेईश मागूशच्या सरपंच सुष्मिता पेडणेकर, डॉ. गोविंद काळे आदि मान्यवर उपस्थित होते. उद्योजक व समाजसेवक शीतल चोडणकर यांच्या पुढाकाराने आणि बीडीएसटीच्या आयुर्वेद महाविद्यालय, वाघोली, पुणे, इंडिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट आणि रिसर्च सेंटर व आयुर्वेद अँड पंचकर्मा हॉस्पिटल, वाघोली, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुकुमार सदानंद देशमुख यांच्या देखरेखेखाली हे शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एक चांगला उपक्रम : सदानंद शेट तानावडे
एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अयोजकांचे अभिनंदन केले. श्रीपादभाऊ केंद्रात आयुष मंत्री असताना आयुर्वेदला जगभरात मान्यता मिळाली. आयुर्वेदला न्याय देण्याचे प्रयत्न ते आयुषमंत्री असताना झाले. धारगळला उभे राहिलेल्या आयुर्वेदिक इस्पितळामागे त्यांचे मोठे योगदान आहे.
गोव्यात लोकांची सेवा करण्यात आनंद : डॉ. सरदेशमुख
गोव्याच्या पूण्यभूमीत वडिलोपार्जित ज्ञानाचा आणि भारतीय प्राचिन शास्त्राचा उपयोग लोकसेवेसाठी करण्याची संधी मला मिळत आहे, याबद्दल मला आनंद होत आहे, असे उद्गार डॉ. सुकुमार सरदेशमुख यांनी काढले. ते म्हणाले, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कॅन्सर ऊग्णांना मोफत उपचार आमच्या संस्थेकडून दिले जातात. त्यासाठी विविध संस्थांकडून, सरकारकडून आम्हाला आर्थिक पाठबळ मिळते. श्रीपादभाऊ आयुष्य मंत्री असताना आमच्या संस्थेला ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स‘ चा दर्जा प्राप्त झाला’. डॉ. गोविंद काळे यांनी केलेल्या मंत्रघोषात समई प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. शीतल चोडणकर यांनी उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक आणि आभार मानले. श्री. आणि सौ शितल यांनी उपचारासाठी आलेल्या ऊग्णांची उत्तम सोय केली.









