प्रतिनिधी / बेळगाव : मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत, सरकारी दरबारी मराठी भाषेला प्राधान्य मिळावे. यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी ‘धरणे आंदोलन’ आयोजन करण्यात आले आहे. त्या बद्दल चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक 31 रोजी श्री चांगळेश्वरी मंदिर येथे संध्याकाळी 7 : 00 वाजता बैठक बोलविण्यात आली आहे, तरी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहवे. असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी व सेक्रेटरी श्री. प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.
Previous ArticleKolhapur; ढोलगरवाडी येथील नागपंचमी कार्यक्रम रद्द..
Next Article निवती येथील 16 मच्छीमारांची किसान कार्डसाठी नोंदणी









