चार हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
वार्ताहर/ म्हसवड
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त म्हसवड मध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शहरातील सर्व शाळातील विद्यार्थी ,शिक्षक मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले होते.ही अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची जागृती प्रभात फेरी यशस्वीरित्या होण्यासाठी सर्व शाळांनी विशेष प्रयत्न विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे व केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
शनिवारी सकाळी आठ वाजता म्हसवड शहरातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागृती प्रभात फेरीचे सुरुवात करण्यात आली. या फेरीमध्ये सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी विद्यालय, ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्यू.काँलेज, न्यू मॉडर्न हायस्कूल, सरस्वती विद्यालय, मेरी माता इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 3, गुरुकुल विद्यालय, जिजामाता विद्यालय,आत्मगिरी विद्यालय, माणगंगा पॅरामेडिकल व इंग्लिश मेडियम म्हासाळवाडी आदी म्हसवड शहरातील सर्वच शाळा त्याचबरोबर विरकरवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल ने ही विशेष सहभाग नोंदविला होता. याच बरोबर म्हसवड नागरपालिकेने ही यामध्ये सहभागी होऊन विशेष सहकार्य केले.
सहभागी होणारे विद्यार्थी क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढय़ातील नेते आदी नेतेमंडळी च्या वेशात सहभागी झाले होते. तसेच देशभक्तीपर गीते, गजीनृत्य, लेझीम आदींचा समावेश ही होता. ही जागृती फेरी बाजार पटांगणातून सुरू करण्यात आली, पुढे म्हसवड नगरपालिका, बसस्थानक चौक पुढे सातारा पंढरपूर रस्त्याने प्राथमिक आरोग्य चौक, मुख्य बाजारपेठेतून सिद्धनाथ मंदिर व पुढे बायपास रस्त्याने पुन्हा बाजारपटांगण चौक येथे येऊन झाली.
या प्रभात फेरीचे नियोजन राजाराम तोरणे, राजेंद्र खाडे यांनी विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे व केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.
अमृत महोत्सव रॅलीत अहिंसाचा सहभाग
हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत म्हसवड येथे निघालेल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तच्या रॅलीतील न.पा. चे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, शिक्षण विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे आदी सह सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचाऱयांना अहिंसा पतसंस्थेच्या वतीने तिरंगा बिल्ले माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी यांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी संचालक प्रितम शहा, कर्मचारी बाबू मुल्ला, आनंदा लिंगे, नाना मासाळ हेही उपस्थित होते. संस्थेच्या पुढे राष्ट्रभक्ती गिते लावण्यात आली होती.
क्रांतीवीर संकुलातील संस्कार विरकर चे कौतुक
क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी संकुलातील सी.बी.सी.ई. चा विद्यार्थी संस्कार लुनेश विरकर याने देशाचे माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वेश परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. याबद्दल संस्कार विरकरचे विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे व केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार यांनी विशेष कौतुक केले.








