प्रतिनिधी / खानापूर
खानापूर पोलिसांकडून शहरात अमलीपदार्थ विरोधी तसेच हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती फेरी काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली खानापूर पोलीस स्थानकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवरून जागृती फेरीला सरुवात झाली. निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीला प्रारंभ केला.यानंतर शहरातील विविध मार्गांवरून ही जागृती फेरी काढण्यात आली. यानंतर येथील राजा छत्रपती चौकात फलकाचे अनावरण करून अमलीपदार्थ सेवना केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी मार्गदर्शन केले. तसेच हेल्मेट वापरण्यासंदर्भात दुचाकीस्वारांना माहिती दिली.









