फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनतर्फे आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी
थॅलेसेमिया दिनानिमित्त फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र संस्थेतर्फे सोमवारी थॅलेसेमिया आजाराविषयी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. दरम्यान ‘सीपीआर’ येथे पहिल्यांदाच मोफत दंत तपासणी करण्यात आली. तसेच ऊग्णांची मोफत रक्त तपासणीही करण्यात आली.
छत्रपती प्रमिलाराजे ऊग्णालय (सीपीआर) येथून रॅलीची सुऊवात झाली. रॅलीमध्ये संस्थेच्या सदस्यांसह, थॅलेसेमिया रूग्ण, पालक, छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाच्या परिचर्या, डॉ. डी. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. शहरातील प्रमुख मार्गावऊन ही रॅली जाऊन पुन्हा ‘सीपीआर’ येथे येऊन सांगता झाली.
दरम्यान ‘सीपीआर’ येथील हिमटोलॉजी वॉर्ड मध्ये रूग्णांची मोफत रक्त तपासणी व पहिल्यांदाच मोफत दंत तपासणी घेण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत, डॉ. गिरीष कांबळे, हिमटोलॉजिस्ट डॉ. वरूण बाफना, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधिर सरवदे, फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, सचिव उमेश पाटील, खजानिस अनिष पोतदार, सहसचिव धनंजय पाडळकर, डॉ. ऋषिकेश पोळ, दत्तात्रय कदम, मंदार कामत, राजू देसाई यांच्यासह थॅलेसेमिया रूग्ण व पालक उपस्थित होते.