एल्सा फर्ना?डीस यांनी केले मार्गदर्शन. हि चळवळ राज्यभर नेणार. सर्वांना जागृत करण्याचे ध्येय.
डिचोली : गोव्याची जिवनदायिनी म्हादई नदीचे अस्तित्व आज धोक्मयात आले असताना राज्यातील अनेकांना म्हादईच्या विषयावर जागृती करण्यासाठी हि जागृती चळवळ राज्यभर नेण्यात येणार आहे. या विषयी राजकारण घुसल्याने हा विफय आता गंभीर झाला आहे. केंद्र सरकारने कर्नाटकचा डिपीआर मंजूर करून गोव्याला म्हादईपासून पोरके करण्याचा इरादा आखला आहे. त्याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी राज्यभर बैठका घेतल्रा जाणार आहेत. अशी माहिती साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी दिली.
म्हादईसाठी राज्यात सुरू झालेले आंदोलन सरकार कशा प्रकारे दाबू पाहत आहे हे गोवेकरांनी पाहिले आहे. त्यासाठी या आंदोलनाला कोणताही राजकीय रंग न देता त्यात सहभागी व्हावे. या चळवळीची व्याप्ती वाढावी यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून त्यात लोकांनी स्वत:हून सहभागी होऊन आपल्या जिवनदायिनीला वाचविण्यासाठी योगदान द्यावे. आमच्या भावी पिढीसाठी आम्हाला या चळवळीत भाग घ्यावाच लागणार आहे. अन्यथा पुढील पिढी आम्हाला जाब विचारणार, असेही नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी म्हटले. सेव्ह गोवा सेव्ह म्हादई फ्रंटतर्फे म्हादईचा राज्यातील निसर्ग आणि पर्यावरणावर काय परिणाम होणार यावर जागृतीसाठी विर्डी साखळी येथे डिचोली तालुक्मयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पर्यावरणवादी एल्सा फर्ना?डिस यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
म्हादईच्या रक्षणासाठी लोक बाहेर पडले असून हि चळवळ आता व्यापक स्वरूपात राज्यभर पसरविण्याची गरज आहे. म्हादई वळविण्यास कारण काय हे सर्वांसमोर आहे. व ते केंद्रातील भाजप सरकारने डिपीआर देऊन सिध्द केले आहे. पुढील पिढीसाठी म्हादई राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी आता बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. हि चळवळ राजकीय नसून ती लोकांची आणि गोव्याच्या अस्तित्वाची चळवळ आहे. त्यात सर्वांनी आपले आणि गोव्याचे अस्तित्व राखण्यासाठी बाहेर पडावे. असे यावेळी मये मतदारसंघातील गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांनी सांगितले.
माजी आमदार प्रताप गावस यांनी यावेळी हा विषय सरकारने राजकीयदृष्ट्या प्रेरीत झालेला आहे. हे बरोबर नाही. म्हादईसाठी विर्डी येथे झालेल्या सभेत अनेक समाजसेवी संघटनांनी सहभाग घेतला होता. त्यावरून या विषयाचे गांभीर्य दिसून येत आहे. या लढ्यात आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. आता केवळ न्यायालयावर भरोसा ठेऊन चालावे लागणार. असे म्हटले. पर्यावरणवादी एल्सा फर्ना?डीस यांनी, लोकांना जागृत करण्यासाठी आपण मार्गदर्शन करीत आहे. म्हादई हे आमचे जिवन आहे. असे समजून ती वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. निसर्गाला आपली वाट व व्यवस्था ठरविण्याचा हक्क आहे. त्यात मावनी अतिक्रमण असू नये. तसे केल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील, असे म्हटले. यावेळी विविध राजकीय नेते, संघटनांचे प्रतिनिधी, पंचसदस्य, नगरसेवक यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांना गोव्याच्या अस्तित्वापेक्षा कर्नाटक प्रिय
गोव्याची जिवनदायिनी म्हादई वाचविण्यासाठी सर्व थरातून प्रयत्न सुरू असताना गोव्याचे मुख्यमंत्री कर्नाटकात जाऊन प्रचार करतात. हि बाब गोव्याच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. म्हादई हा गोव्याच्या अस्तित्वाचा आज विषय बनला आहे. या विषयी मुख्यमंत्री किती गंभीर आहेत हे त्यांच्या राजकीय स्वभावातून दिसत आहे. पक्षाचा आदेश मानण्यास मुख्यमंत्री जरी बांदील असले तरी राज्याच्या अस्तित्वाच्या विषयी त्यांनी गोव्याची बाजू उचलून धरणे आवश्यक होते. परंतु तसे त्यांच्याकडून घडले नसल्याने शंका येते, अशी नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी यावेळी केली.









