मोठ्या संख्येने महामोर्चामध्ये सहभागी होण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
बेळगाव : कन्नडसक्ती विरोधात सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. मध्यवर्ती म. ए समितीने केलेल्या आवाहनानुसार सध्या गल्लोगल्ली महामोर्चासाठी जागृती केली जात आहे. बुधवारी शहापूर परिसरात जागृती करून मोठ्या संख्येने महामोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. शहापूर मधील कोरे गल्ली, हट्टीहोळी गल्ली, कचेरी गल्ली, रामलिंगवाडी परिसरात जागृती केली. यावेळी गल्लीतील म ए समिती कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे,मनोहर शहापूरकर,राजाराम मजुकर,राजकुमार बोकडे,राजू चिगरे,किरण पाटील, गजानन शहापूरकर,मोहन पाटील,रणजीत हावळानाचे, अभिजीत मजुकर,रवी जाधव, आनंद पाटील,नागेश कुंडेकर,शंकर पाटील,सुनील कुर्गें, राजू मजुकर,महेश पाटील, महेश कुंडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









