बसचालक, वाहक-प्रवाशांना मार्गदर्शन
बेळगाव : रस्ता सुरक्षेबाबत वाहनचालक, वाहक आणि प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जात आहे. परिवहनतर्फे सोमवारी पहिल्या आगारात रस्ता सुरक्षा साप्ताहाला प्रारंभ झाला. आरटीओ विभागाचे हुग्गी, डिटीओ देवाक्का नाईक, डेपो मॅनेजर लिंगराज लाठी आदेंच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली. अलिकडे वाहनांचे अपघात वाढले आहेत. यामध्ये खासगी आणि सरकारी बसचाही समावेश आहे. हे अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी परिवहनतर्फे जागृती केली जात आहे. बसचालक, वाहक, प्रवाशांमध्ये याबाबत प्रबोधन केले जाते. बसचालकांना प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन याबाबतही मार्गदर्शन केले. रस्ते सुरक्षा सप्ताहाबरोबर स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जात आहे. बसवाहक आणि चालकांना वाहतुकींच्या नियमांचे पालन करणे, वाहने एकाग्रतेने चालविणे आणि प्रथमोपचाराबाबत माहिती देण्यात आली. बसचालक आणि वाहकांनी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाताना प्रवाशांची कोणती काळजी व दक्षता घ्यावी याची परिवहनच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी बसवर चित्रफिती लावून जागृती केली यावेळी परिवहनचे अधिकारी बसचालक, वाहक, पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.









