उद्या मराठी साहित्य संमेलनात होणार पुरस्कारांचे वितरण
सावंतवाडी । प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे स्व . मिलिंद भोसले व स्व . ॲड दीपक नेवगी स्मृती पुरस्कार भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत – भोसले आणि देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांना जाहीर झाला असून उद्या सावंतवाडी बॅरिस्टर नाथ पै येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार वितरित केले जाणार आहेत .









