जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी आचरे येथे पुरस्काराचे वितरण
आचरा । प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरा पंचक्रोशीचा 2024 चा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव भिवा आचरेकर यांना जाहीर झाला होता हा पुरस्कार मंगळवारी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी श्रीदेव रामेश्वर मंदिर आचरे येथे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांनाचे अध्यक्ष तथा धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अशोक कांबळी, खजिनदार कपिल गुरव, जेम्स फर्नांडीस, चंद्रकांत घाडी, भिकाजीं कदम, प्रकाश पेडणेकर सर, बाबाजी भिसळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.









