सावंतवाडी / प्रतिनिधी
Awarded Adarsh Librarian Award to Librarian Mahendra Patel
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांच्या हस्ते करण्यात आला प्रदान
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर चे ग्रंथपाल महेंद्र पटेल यांना आदर्श ग्रंथपाल म्हणून जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने पुरस्कार आला . होता जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात आज रविवारी तो वितरित करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा. सचिन हजारे यांच्या शुभहस्ते आदर्श ग्रंथपाल पुरस्कार महेंद्र जनार्दन पटेल यांना प्रदान करण्यात आला. तेव्हा मा. रणजित देसाई जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य सचिव मंगेश मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.