बेळगाव : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट, शिनोळी (ता. चंदगड) च्या शिक्षक व विद्यार्थिनीला ‘बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार’ देण्यात आला. ‘जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई’मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘133 व्या’ बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय चित्र प्रदर्शनात ‘जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट शिनोळी, चंदगडचे शिक्षक अतिफ पाच्छापुरी यांना ‘रंगा फडके पुरस्कार’ देण्यात आला आहे. याच कॉलेजची द्वितीय वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी सौंदर्या बनसोडे हिला ‘उत्कृष्ट स्थिर चित्रा’चे महेंद्रभाई रादीया फौंडेशनचा पुरस्कार देण्यात आला. प्रा. प्रमोदभाऊ रामटेके, पद्मश्री वासुदेव कामत, पद्मश्री अच्युत पालव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे.










