► वृत्तसंस्था / सिंगापूर
सिंगापूर येथील नान्यांग तंत्रवैज्ञानिक विद्यापीठात प्राध्यापक असलेले भारतीय वंशाच्या साहित्यिका प्रशांथी राम यांना सिंगापूरचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘नाईन यार्ड सारीज’ (नऊ वारी साड्या) या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही घोषणा बुधवारी करण्यात आली.
आपल्या साहित्यकृतीची निवड या मोठ्या पुरस्कारसाठी होईल, अशी आपली अपेक्षा नव्हती. त्यामुळे पुरस्काराची घोषणा समजल्यानंतर आपल्याला आनंदाश्चर्याचा धक्का बसला, अशी प्राथमिक प्रतिक्रिया प्रशांथी राम यांनी व्यक्त केली. नाईन यार्ड सारीज ही एका सिंगापूर, सिडनी, न्यूयॉर्क आणि कनेक्टिकट येथे विस्तारलेल्या ब्राम्हण कुटुंबाची कथा आहे. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा अन्य अनेक नवोदित लेखकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि अधिकाधिक युवक लेखनक्षेत्राकडे आकृष्ट होतील, असेही प्रतिपादन राम यांनी केले.