“Awaken the old memories of Sawantwadi, be expressive!”
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून ”सावंतवाडीच्या जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा !” या उपक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनानं करण्यात आली. माझी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी कोमसापचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांनी सावंतवाडीच्या आठवणी कथन करत असताना आठवणी जागवा, व्यक्त व्हा या उपक्रमा मागचा उद्देश विशद केला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम कोमसापच्या वतीने राबविण्यात आला असून असंख्य वक्त्यांनी व्यक्त होण्याची, आठवणी जागृत करण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, वेळेअभावी सर्वांनाच बोलता आलं नाही. परंतु, आपल्या आठवणी लिखीत स्वरुपात आमच्याकडे द्याव्यात, त्या आठवणींचा संग्रह केला जाईल असे मत श्री. सावंत यांनी व्यक्त केले. यानंतर मनोगत व्यक्त करत असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आठवणीतील सावंतवाडी उपस्थितांसमोर उभी केली. शहरातील वास्तुंच्या आठवणी सांगत असतानाच मोती तलावात रंगलेल्या क्रिकेट सामन्याला देखील त्यांनी उजाळा दिला. तर या उपक्रमात व्यक्त केलेल्या आठवणींचा लिखित स्वरूपात संग्रह करून पुस्तिका तयार करण्याचा मानस श्री साळगावर यांनी व्यक्त केला.
सहसचिव राजू तावडे यांनी सावंतवाडी शहरातील जुन्या काळातील अनेक आठवणी सांगत सावंतवाडी उभे केली त्यानंतर रविंद्र ओगले, अरूण वझे, अँड. अरूण पणदूरकर, अँड. नकुल पार्सेकर, शंकर प्रभू, मेघना राऊळ, चंद्रकांत घाटे, रामदास पारकर, डॉ. जी.ए. बुवा, प्रा. गिरीधर परांजपे, भरत गावडे आदींन मनोगत व्यक्त करताना हृदयातील सावंतवाडीच्या आठवणी जागवत त्यांना उजाळा दिला.
सावंतवाडी / प्रतिनिधी